Eye Donation: ६० वर्षांनंतर डोळ्यात उजेड! नेत्रदानामुळे ६३ वर्षीय महिलेची यशस्वी नेत्ररोपण शस्त्रक्रिया; बालपणापासूनचे अंधत्व दूर
Eye donation restores sight after 60 years of blindness: तरुणाच्या मरणोत्तर नेत्रदानातून ६३ वर्षीय वंदना डुंबरे यांना मिळाला नवा उजेड; गॅलॅक्सी आय हॉस्पिटलमध्ये पाच तासांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर साठ वर्षांचे अंधत्व दूर
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नेत्रदान आणि कॉर्निया नेत्रतज्ञ डॉ. आरूषी गोयल - देशमुख यांनी केलेल्या ५ तासांच्या गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे ६० वर्षांनंतर अंधत्व दूर होऊन वंदना डुंबरे यांना नवी दृष्टी मिळाली.